औरंगाबाद ग्रामीण मधील गुंडगिरी व अवैध धंदे संपवणार – पोलिसअधीक्षक मनीष कलवानिया

विरगाव पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी
वैजापूर ,२९ मे /प्रतिनिधी :-औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी  वीरगाव पोलीस स्टेशनला वार्षिक तपासणीच्या निमित्ताने औरंगाबाद ग्रामीणचे भेट दिली.प्रसंगी कलवानिया यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान त्यांनी या प्रकरणात सुरवात झालेली असून जिल्ह्यामध्ये अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार आहेत पुढे त्यांनी सांगितले की, औरंगाबाद ग्रामीण मध्ये चार हद्दपारीचे आदेश पारित केले असल्याची माहिती दिली व आणखी तीन प्रस्ताव हे प्रलंबित असून लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येईल असे संबोधले. विरगाव पोलिस ठाण्याची कामगिरी चांगली असून अनेक गुंतागुंतीच्या गुन्हाची उकलही विरगाव पोलीसांनी केलेली आहे.

पुढे बोलताना कलवानिया म्हणाले की जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिस प्रशासन लगाम लावून कठोर करवाई करणार अशी माहिती दिली.पत्रकारांशी साधलेल्या या संवादामध्ये कलवानिया यांनी सामान्य नागरिकांना दुर्लक्षित करून गुंडांना खुर्ची देणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांची खैर नाही असा अप्रत्यक्षरित्या संदेश दिला.नवीन अधीक्षक आल्यापासून ग्रामीण भागातील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये अवैध धंद्यांवर कारवाईला वेग आलेला असून यावर ग्रामीण भागातील लोकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे व लवकरच अवैध धंद्यांवर चाप बसून ग्रामीण भागात सुरू असलेलं गुंडाराज संपेल अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे या प्रसंगी विरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनमोल केदारे व पोलिस अधीक्षक ग्रामीणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.