वैजापूर शहरातील लाडगाव चौफुलीवर बेकायदा दारू साठा घेऊन जाणाऱ्या दोघांना पकडले ; दुचाकीसह 55 हजारांचा मुद्देमाल जप्त

वैजापूर,१९ जुलै /प्रतिनिधी :-वैजापूर शहरातील लाडगाव चौफुली कमानी जवळ पोलिसांनी दुचाकीवर बेकायदा विक्री करण्यासाठी दारुचा साठा घेऊन जाणऱ्या दोघांआ पोलिसांनी पकडले.ही कारवाई बुधवारी सकाळी पावणे आठ वाजता  करण्यात आली.

या प्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असुन त्यांच्याकडुन ७२ देशी दारुच्या बाटल्या व एक दुचाकी असा ५५ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. दारुची किंमत पाच हजार ७६० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुभाष साहेबराव फुलारे (३१, राहणार धरणग्रस्त कॉलनी) व नानासाहेब पुंजाजी पडवळ (राहणार डवाळा) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल महेश बिरुटे यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास हेड कॉन्स्टेबल भास्कर हे करीत आहेत.