जालना जिल्ह्यात 135 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि.8 (जिमाका) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 62 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआर तपासणीव्दाारे 81 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 54 व्यक्तींचा अशा एकुण 135 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-12049 असुन सध्या रुग्णालयात-275 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4231, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-305, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-39926 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-53, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-135 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-5917 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-33569, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-339, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3813

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-21, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-3643 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-148, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-801, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-47, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-275,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-68, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-62, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-4198, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1562 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-59397 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-157 एवढी आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात परतुर शहरातील येथील 70 वर्षीय कोरोना बाधित पुरुष रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 39 नागरिकांकडून 7 हजार 130 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 4 हजार 604 नागरीकांकडुन 9 लाख 72 हजार 290 रुपये एवढा दंड वसुल करण्याहत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *