स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वैजापुर न्यायालयातर्फे भव्य तिरंगा रॅली ; रॅलीत तीन हजार शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

“भारत माता की जय”या जयघोषाने शहर दुमदुमले

वैजापूर,१३ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- वैजापूर जिल्हा सत्र व दिवाणी न्यायालय वैजापूरच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सवानिमित्त तिरंगा ध्वजाच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीमध्ये वैजापूर शहरातील 13 शाळेतील 3000 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.

यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायधीश एम.मोईनोद्दिन एम ए, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर,  तदर्थ जिल्हा व सत्र न्यायधीश पी.पी.मुळे, दिवाणी न्यायालय वरिष्ठ न्यायधीश आर. एम. नेरलीकर, आर. एम. कराडे ,न्यायधीश आर. एन. प्रथम वर्ग न्यायधीश एस. के. खान ,न्यायधीश व्ही. आर. कुलकर्णी, न्यायाधीश डी. एम. पवार  यांच्या मार्गदर्शनाखाली “भारत माता की जय”या जयघोषाने विद्यार्थ्यांनी वैजापूर शहरातून हाताशी तिरंगा ध्वज बाळगून आनंदोत्सव साजरा केला. या रॅली मध्ये शहरातील न्यू हायस्कूल, नूतन कन्या शाळा ,सेंट मोनिका इंग्रजी शाळा, करूणा निकेतन शाळा, उर्दू हायस्कूल, मौलाना आझाद, आरोहण अकॅडमी, श्री. स्वामी समर्थ विद्यालय, कन्या प्रशाला, राजमाता जिजाऊ हायस्कूल या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

रॅलीत उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार राहुल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, गटविकास अधिकारी एच. आर. बोयनार, मुख्याधिकारी बी.यु. बिघोत, कृषी अधिकारी अशोक आढाव, महावितरणचे अविनाश जयंते, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, नायब तहसीलदार महेंद्र गिरगे, किरण नारखेडे, उपमुख्याधिकारी राहुल साठे, वकील संघाचे पदाधिकारी व विविध विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.