वैजापूर तालुक्यात ‘शिवसेना – वंचित’ तर्फे युतीचा जल्लोष

वैजापूर ,२५ जानेवारी / प्रतिनिधी :- शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना व वंचित बहुजन आघाडीची युतीची घोषणा झाल्यानंतर वैजापूर तालुक्यातील महालगांव व खंडाळा येथे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी (ता.23) युतीची घोषणा केली. या घोषणेनंतर महालगांव व खंडाळा येथील शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून व फटाके फोडून जल्लोष केला.

महालगांव येथे महामानवांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे, उपजिल्हाप्रमुख संजय पाटील निकम, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन वाणी, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाअध्यक्ष सिध्दार्थ तेझाड, शिवसेना उपतालुका प्रमुख डाॅ. प्रकाश शेळके, रमेश पाटील सावंत, माजी पंचायत समिती सदस्य देविदास जाधव, सोसायटीचे चेअरमन पुंजाराम काळे, राजु हुमे, कैलास शेळके, नामदेव आल्हाट, सुनिल आल्हाट, खंडु आल्हाट,  सरपंचपती नानासाहेब काळे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर गलांडे, संपत जाधव, राहुल आल्हाट, मॅचिंद्र आल्हाट, राजु गलांडे, योगेश मोहिते, नवनाथ गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे शहरअध्यक्ष जाकेरभाई पठाण, अस्लम पठाण, किरण पठारे, अंकुष पठारे, गौतम जाधव, आरुण सोनवणे, दयानंद आल्हाट, अशोक पगारे, कडु बोरडे, राहुल साळवे, किरण पठारे, रंभाजी आल्हाट यांच्यासह शिवसेना व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

खंडाळा येथे रॅली काढण्यात आली. महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिवसेना व वंचित बहुजन युतीचा जल्लोष करण्यात आला.पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्यासंख्येने उपस्थित होते