राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांना वैजापुरात अभिवादन

वैजापूर ,१२ जानेवारी / प्रतिनिधी :- राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांना शहरातील विविधभागात अभिवादन करण्यात आले.

Displaying IMG-20220112-WA0173.jpg

मुख्य कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रशांत सदाफळ, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष धनंजय गायकवाड, ब्रिगेड प्रमुख वाल्मिक इंगळे, स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत ,बी,के,जाधव, बाळू कोतकर, गोरख पवार यांनी प्रथम राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

धोंडीरामसिंह राजपूत यानी जिजाऊंच्या जीवन कार्यावर कविता सादर केली. संभाजीनगर कॉलनीतही राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी रणजित मथुरिया, दिलिप अनर्थे, सागर इंगळे, अशोक कराळे, शरद जगधने, गणेश निंबाळकर, गणेश पाटील, प्रमोद शेळके, अण्णा साहेब ठेंगडे, बबनराव क्षीरसागर, प्रकाशपाटील, प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन, श्री. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.  संभाजी ब्रिगेड च्यावतीने वाल्मिकी इंगळे यांनी आभार मानले.