वैजापूर शहरात प्रजासत्ताकदिनी श्री.देवकीनंदन महाराज यांची एकता फेरी

वैजापूर ,२५ जानेवारी / प्रतिनिधी :- भारतीय प्रजासत्ताकदिन हा उत्सव अधिक आनंददायी व्हावा म्हणून वैजापूर येथे सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेचे भागवताचार्य श्री. देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी या दिनी भागवत कथेची वेळ दुपारी 2 ते 5 अशी ठेवली असून सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमस्थळी जमलेल्या सर्व भाविक भक्त यांची ‘देशप्रेम व कृष्णप्रेम एकता फेरी’ शहरातील जीवनगंगा वसाहत येथून ते संकटमोचन हनुमान मंदिर पर्यंत काढण्याचा मनोदय त्यांनी मंगळवारी (ता.25)  व्यक्त केला. या फेरीतून राष्ट्रप्रेम,राष्ट्रनिष्ठा व भगवान श्रीकृष्ण प्रेम व्यक्त करून सनातन संस्कृतीचा संदेश  संपूर्ण विश्वाला जाईल असे विचार त्यांनी मांडले.

पुढे बोलताना महाराज म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या शरीराची योग्य ती रक्षा केली पाहिजे, शरीराचे रक्षण हा सर्वात मोठा धर्म आहे तो प्रत्येकाने पाळायलाच हवा.सत्संग बाबत ते म्हणाले, सत्संगात फोटो काढण्यापेक्षा सत्संगातील संस्कार घेऊन अंगिकारने अत्यंत महत्वाचे आहे. गो-पालन करणे  हे भारतीय  संस्कृती व सनातन धर्माचे

मर्म आहे ते सर्वांनी पाळावे असे महाराज म्हणाले  श्रीराम ट्रॅक्टर्सचे सोमासे परिवार ऊस बांधवांनी वृन्दावन येथील गो-शाळेसाठी सोनालीका ट्रॅक्टर महाराजांच्या सुपूर्द केले. साहेबराव सोमासे व भावलाल काका सोमासे यांनी महाराजांना ट्रॅक्टरची चावी प्रदान केली. सूत्रसंचलन व आभार ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत यांनी मानले. या प्रसंगी माजी आमदार सुभाष भाऊ झाम्बड, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, चिंचडगाव आश्रमचे हभप राजेश्वरगिरी महाराज तसेच शिवशरणगिरी महाराज यांनी हजेरी लावून आरती केली.