राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी जिल्हाधिकारी चव्हाण यांच्याविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांचे निवेदन

वैजापूर,१३ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील सर्व पक्षाच्या व संघटनांच्यावतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येऊन औरंगाबाद जिल्हाधिकारी  सुनील चव्हाण यांनी राष्ट्रध्वजचा अवमानप्रकरणी त्याच्यावर राष्ट्रद्रोहचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. 
या वेळी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष  मा. राजेंद्र बागुल, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाप्रभारी बाबासाहेब पगारे, रिपब्लिकन पार्टीचे वैजापूर शहराध्यक्ष बाळासाहेब त्रिभुवन, माजी पंचायत समिती सदस्य विलास जाधव, चांडगाव ग्रामपंचायत सदस्य लहानू त्रिभुवन, बहुजन समाज पार्टीचे शहर अध्यक्ष ऋषिकेश त्रिभुवन, वंचित बहुजन आघाडीचे वैजापूर शहर महासचिव प्रवीण शिंदे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रवीण गायकवाड, काकासाहेब वाघ आदी उपस्थित होते