आझादी का अमृत महोत्सव व स्वछता अभियानांतर्गत वैजापुरात राष्ट्रीय पुरुषांचे पुतळे व स्मारकाची स्वछता

वैजापूर ,१२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  वैजापूर नगरपालिकेच्यावतीने “आझादी का अमृत महोत्सव व स्वच्छता अभियान -२०२२” तसेच माझी वसुंधरा याअभियानांतर्गत शहरातील सर्व राष्ट्रीय पुरुषांचे पुतळे व हुतात्मा स्मारकात शनिवारी सकाळी स्वच्छता करून राष्ट्रीय महापुरुष  अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते व स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत, काँग्रेसचे साहेबराव पडवळ यांनी सर्वप्रथम डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा परिसर स्वच्छ केला व त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर नगरसेवक शैलेश चव्हाण, पारस घाटे, नगरपालिकेचे स्वछता निरीक्षक विष्णू आलूले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्वच्छता करून अभिवादन केले.महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला नगरसेवक दशरथ बनकर व भाजपचे महेश भालेराव यांनी अभिवादन केले. तर महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याला भाजपाचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत व जेष्ठ नागरिक धोंडीराम राजपूत, काशीराम राजपूत, सोपान निकम,  पत्रकार घनश्याम वाणी, शैलेश चव्हाण, पारस घाटे  यांच्यासह स्वछता विभागाचे विजय सपकाळ, प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन, दीपक साकला, कुणाल दिवेकर यांनी अभिवादन केले.

हुतात्मा स्मारक येथे आधार जेष्ठ नागरिक सेवा संघाचे अण्णासाहेब शेळके, श्री कुंदे, घनश्याम वाणी, चैतन्य जेष्ठ नागरिक संघ व वैजीनाथ जेष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी  स्वच्छता करून स्मारक स्तंभला  अभिवादन केले. याप्रसंगी “स्वच्छ शहर – वैजापूर शहर” ठेऊन वसुंधरा अभियानांतर्गत ही प्रतिज्ञा राजपूत यांनी सर्वांना दिली