वैजापूर विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पुलांच्या कामांसाठी 114 कोटींचा निधी मंजूर – आ.रमेश बोरणारे

वैजापूर,१८ जुलै /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील विविध रस्त्यांना जोडणाऱ्या रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी राज्य सरकारने 114 कोटी 94 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आ.रमेश पाटील बोरणारे यांनी दिली. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत या कामांना मंजुरी मिळाली असून यात सहा पुलांसह 15 रस्त्यांचा समावेश आहे.

वैजापूर विधानसभा मतदारसंघात असलेल्या वैजापूर व गंगापूर तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यांची दुरवस्था झालेली असून रस्ते व पुलांच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी होती. आ.रमेश पाटील बोरणारे यांनी नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे रस्ते व पुलांच्या कामाचे प्रस्ताव सादर केले होते. पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत रस्त्यांच्या या कामांना मंजुरी देण्यात आली.

यात प्रजिमा – 29 वरील पुरणगांव ते नागमठाण रस्त्याचे डांबरीकरण (20 कोटी रुपये), करंजगांव- गारज ते मनूर प्रजिमा – 39 रस्ता डांबरीकरण (12 कोटी रुपये), प्रजिमा – 89 वरील सवंदगांववाडी – भिवगांव – धोंदलगांव (10 कोटी 44 लाख रुपये), प्रजिमा- 60 वरील जांबरखेडा फाटा ते सोनवाडी (10 कोटी रुपये), लासूरगांव ते शिवना नदी व पालखेड ते वाघलगांव (9 कोटी 60 लाख रुपये), नालेगांव – रघुनाथपुरवाडी ते शिऊर (5 कोटी 24 लाख रुपये), शिवराई – सवंदगांव ते पानगव्हाण (5 कोटी 70 लाख रुपये), शिऊर ते बोलठाण (6 कोटी रुपये), चिंचडगांव ते कनकसागज ( 2 कोटी रुपये), चोरवाघलगांव ते हनुमंतगांव (2 कोटी रुपये), शिऊर ते टूणकी (2 कोटी 50 लाख रुपये), शिऊर ते हाजीपुरवाडी (2 कोटी रुपये),हनुमंतगांव ते वीरगांव 2 कोटी 80 लाख रुपये), बोरसर ते कोल्ही 3 कोटी 50 लाख रुपये) ही रस्त्यांची कामे मंजूर झाली आहे.

या शिवाय सहा पुलांची कामे ही मंजूर झाली असून त्यात गंगापूर तालुक्यातील प्रजिमा – 64 (2 कोटी रुपये) व प्रजिमा – 27 वर लहान पूल ( 1 कोटी 88 लाख रुपये), वैजापूर तालुक्यातील मनूर पूल (12 कोटी रुपये), वांजरगांव पूल 1 कोटी 45 लाख रुपये), गाढेपिंपळगांव येथे दोन पूल (1 कोटी 72 लाख रुपये), भिवगांव येथील पूल (1 कोटी 71 लाख रुपये) या 21 कामांना मंजुरी व प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.अशी माहिती आ.रमेश पाटील बोरणारे यांनी दिली.