महालगावजवळ बस व मोटारसायकलच्या अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी

वैजापूर,१८ डिसेंबर / प्रतिनिधी :-गंगापूर – वैजापूर रस्त्यावर महालगांवजवळ बस व मोटारसायकलचा अपघात होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकस्वार ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (ता.17) दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात कृष्णा नांगरे (वय 28) याचा मृत्यू झाला तर कैलास सोमवते हा गंभीर जख्मी झाला दोन्ही युवक महालगांव ता.वैजापूर येथील रहिवासी आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी की, महालगांवहून गंगापूरच्या दिशेने मोटार सायकल बजाज प्लाटीना (क्र. MH 20, GA- 4926) जात असतांना  गंगापूरहून वैजापूरकडे येणार्‍या वैजापूर आगाराची बस (क्र.MH 40 एन 9738) यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये मोटरसायलवरील दोघेही गंभीर जख्मी झाले त्यांना विरगाव पोलिसांनी वैजापूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले असता डाॅक्टरांनी तपासून  कृष्णा नांगरे यास मृत घोषीत केले. उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिले तर दुसरा गंभीर जख्मी कैलास सोमवते यास पुढील उपचारासाठी  औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. या घटनेची विरगाव पोलिसात नोंद झाली असुन पुढील तपास विरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक नवनाथ कदम, बीट जमादार विजय बाम्हदे, गुणवंत थोरात हे करीत आहे.