वैजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती सेवानिवृत्त ; सेवापूर्ती सोहळा उत्साहात

वैजापूर, २ मे  /प्रतिनिधी :- वैजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती आपली 33 वर्ष सेवा पूर्ण करून विहित वयोमाननुसार 30 एप्रिल 2022 रोजी सेवा निवृत्त झाले. त्यांना वैजापूर शहर व तालुका तसेच  पोलिस  स्टेशनच्यावतीने रविवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. 

शासनाची 33 वर्षे सेवा केल्यानंतर आपल्या कुटुंबासह सुखी,आनंदी व निरोगी रहा अशा शुभेच्छा  या प्रसंगी आ.रमेश पाटील बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, राजूसिह राजपूत यांनी बोलताना दिला. उपविभागीय अधिकारी कैलास प्रजापती यांच्यासमवेत सेवानिवृत्त झालेले वैजापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार पी.बी.वेलगुडे यांनाही यावेळी निरोप देण्यात आला तर पोलिस  सेवेत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल दिले जाणारे पोलिस महासंचालक यांचे पदक मिळाल्याबद्दल पोलिस नाईक संजय घुगे यांचाही गौरव करण्यात आला.

पोलिस  स्टेशनच्यावतीने पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत व सर्व सहकाऱ्यांनी श्री.प्रजापती व श्री.वेलगुडे यांना निरोप दिला. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्र संचलन सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले तर आभार संजय घुगे यांनी मानले. मर्चंट बँक चेअरमन विशाल संचेती, व्यापारी संघाचे काशीनाथशेठ गायकवाड, प्रकाश बोथरा, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबसाहेब जगताप, काझी हाफीजुद्दीन, नगरसेवक गणेश खैरे, भाजपचे गौरव दोडे,, गौतम गायकवाड, आसरा फाउंडेशन, पोलीस पाटील संघटना, पत्रकार संघ, गणेश खैरे, गौरव दौडे, राजू चहावाला यांनीही सत्कार करून निरोप दिला. पोलिस कॉन्स्टेबल मनोज कुलकर्णी, संजय घुगे यांनी मनोगत व्यक्त केले तर निरोपाला उत्तर देताना श्री.प्रजापती व श्री. वेलगुडे यांनी सेवाकाळात नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, उपतालुकाप्रमुख महेश बुणगे, शिवूर पोलिस  ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पाटील, विरगाव पोलीस ठाण्याचे श्री.नरवडे आदी उपस्थित होते.