वैजापूर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक ; डॉ.आंबेडकर जयंतीची मिरवणूक न काढण्याचा निर्णय

वैजापूर,११ एप्रिल  /प्रतिनिधी :- भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरयांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (ता.11) पोलिस स्टेशन वैजापूर येथे शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीत डॉ,बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रतिमेची मिरवणूक न काढता जागेवरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून त्याचठिकाणी भीमगीत गायन व अभिवादनाने शांततेत जयंती साजरी करण्याचे सर्वानुमते ठरले.

डीजे न लावण्याच्या सूचनाही यावेळी बैठकीत देण्यात आल्या. या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती, तहसीलदार राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन पोलीस नाईक संजय घुगे यांनी केले. नगरसेवक दशरथ बनकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ गायकवाड, प्रकाश बोथरा, राजेश गायकवाड, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, पारस घाटे, सदर ए काझी हाफीजुद्दीन, अल्ताफ बाबा, हिकमतउल्ला, धर्मेंद्र त्रिभुवन, संतोष त्रिभुवन, बाबा त्रिभुवन, विलास म्हस्केयांच्यासह वीज वितरण कंपनी व नगरपालिकेचे कर्मचारी तसेच शांतता समिती सदस्य मोठ्यासंख्येने उपस्थित होते.