वैजापूर शहरात “वटपौर्णिमा” उत्साहात

वैजापूर ,१४ जून  /प्रतिनिधी :-सुहासिनींचा अत्यंत जिव्हाळ्याचा मानला जाणारा “वट पौर्णिमा”हा सण शहर व परिसरात सुहासिनींनीवडाच्या झाडाला पवित्र व मंगलमय पांढरा धागा लपेटून जन्मोजन्मी आहे तोच पती मिळावा अशी प्रार्थना व पूजा “सत्यवान -सावित्री” यांचे स्मरण करून केली.

येथील श्री. स्वामी समर्थ मंदिरात वडाचे झाड आहे. येथे सकाळपासूनच सुहासिनी गटा-गटाने येऊन ओटी भरुन व वडाच्या झाडाला पांढरा धागा बांधून पूजेत मग्न होत्या. शहरातील पाटील गल्ली, परदेशी गल्ली येथेही वडाच्या झाडांची मोठ्या भक्ती भावाने पूजा करून जन्मोजन्मी आहे तोच पती रहावा अशी प्रार्थना सुहासिनींनी आपल्या सुहासिनी पेहरावात केली. अत्यंत आनंद व उत्साहात हा सण शहर व परिसरात साजरा करण्यात आला.