वैजापूर येथे थोर समाजसुधारक महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

वैजापूर,११ एप्रिल  /प्रतिनिधी :- थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची 195 वी जयंती सोमवारी (ता.11) वैजापूर शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.


शहरातील सर्व क्षेत्रातील नागरिकांनी महात्मा फुले पुतळा परिसरात  एकत्र येऊन थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले याना अभिवादन केले. आ.रमेश पाटील बोरणारे, मा.नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ,दिनेश परदेशी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, सदाफळ, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष काशीनाथ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत, नगर सेवक दशरथ बनकर, स्वप्नील जेजुरकर, बाळासाहेबशिंदे,माधुरी बनकर,अनिता गायकवाड,जयश्री गायकवाड, वैशाली गायकवाड,श्रीमती द्वारका पवार, सुनीता पवार, सुनीता गायकवाड, अनिता गायकवाड, कविता देवकर, वैष्णवी देवकर,चांगदेव उघडे, सलीम तांबोळी,रतीलाल गायकवाड, प्रकाश माळी, विनोद गायकवाड, शशिकांत भालेराव, महेश भालेराव, बाबा गायकवाड, दिलीप अनर्थे, राजेश गायकवाड, ज्ञानेश्वर टेके, वाल्मिक इंगळे, मोती वाघ, जगन गायकवाड, गौतम गायकवाड आदींनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.