विनायकराव पाटील महाविद्यालयात विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा

वैजापुरात विनायकराव पाटील महाविद्यालयात स्पर्धेचे आयोजन

वैजापूर ,११ मार्च / प्रतिनिधी :- येथील विनायकराव पाटील महाविद्यालयातील  संगणकशास्त्र विभाग व विज्ञानमंडळाच्यावतीने  जागतिक संगणक साक्षरता दिनानिमित्त  विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विषयाशी निगडीत पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते. 

स्पर्धेचे  उद्घाटन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अप्पासाहेब पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजीराव थोरे यांच्याहस्ते करण्यात आले.  या स्पर्धेत महाविद्यालयातील 66 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विविध विषयावर 33 भित्तीपत्रके तयार केली. याप्रसंगी सर्व सहभागी विद्यार्थ्यांशी हितगुज करून स्पर्धेतील सर्व भित्तीपात्राकास भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. परीक्षक म्हणून संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा.अनिल थोरे व प्रा.ए.व्ही.गायकवाड यांनी काम पाहिले. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.दादासाहेब साळुंके, डॉ.संदीप परदेशी,रजिस्ट्रार विजय आहेर, प्रा.शिवांगी त्रिभुवन, प्रा.मेघा राऊत, प्रा.आरती आहेर,कार्यक्रमाचे समन्वयक लेफ्टनंट श्रीकांत डोखे, प्रा.गणेश पठारे व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी स्पर्धेस भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. तसेच महाविद्यालयातील विविध विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.