वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात ‘सुंदर माझा दवाखाना’ उपक्रमांतर्गत स्वछता अभियान

वैद्यकीय अधिकारी, नर्सेस व कर्मचारी जेव्हा हातात झाडू घेतात…

वैजापूर ,११ एप्रिल  / प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग मार्फत 07 एप्रिल ते 14 एप्रिल या काळात”सुंदर माझा दवाखाना” या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णालयांची अंतर्गत व बाह्य स्वछता करण्यात येत आहे.याचाच भाग म्हणून येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी (ता.10) सामाजिक कार्यकर्ते  धोंडीरामसिंह राजपूत यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन टारपे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष पाटणी, डॉ. सुधाकर मुंढे, डॉ. निलेश आंधळकर, मुख्य परिचारिका रुख्मिणी गवई व आयसीटीसी विभागचे विजय पाटील, शशिकांत पाटील यांनी सहकाऱ्यांसह ट्रामा केअर सेंटर व उपजिल्हा रुग्णालय परिसर स्वच्छ केला. रोज रुग्णांना तपासणारे हात, इंजेक्शन देणाऱ्या हातांनी प्रत्यक्ष खराटा हातात घेऊन स्वच्छता केली.  उपजिल्हा रुग्णालयात दररोज वेगवेगळ्या विभागात व परिसरात स्वच्छता सुरू असून 14 एप्रिलपर्यंत स्वच्छता सुरू राहणार आहे. यात विजया जंगम

शर्मिला पाडवी, प्रतिभा मुंढे, निवेदिता सिरते, उर्मिला जाधव, विजय पाटील, किसन चौधरी, शशिकांत पाटील, श्याम उचित, भास्कर दुधारे, संजय शिराळे, रामेशवर नारळे, रामेश्वर सोनवणे व इतर आरोग्य कर्मचारी सहभागी झाले आहेत.