वैजापूर सायकलिस्ट व स्विमिंग ग्रुपच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन

महात्मा जोतिबा फुले यांनी विश्वाला मानवतेचा संदेश दिला –  धोंडिरामसिंह  राजपूत 

वैजापूर ,११ एप्रिल  / प्रतिनिधी :- थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांनी जगतात स्त्री व पुरुष या दोनच जाती मानून संपूर्ण विश्वाला स्त्री-पुरुष समानता हे तत्व प्रदान करून मानवता संदेश दिला असे उदगार समाज कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यानी मंगळवारी (ता.11) शहरातील सायकलिस्ट व स्वीमिंग ग्रुपच्यावतीने आयोजित महात्मा जोतिबा फुले यांच्या अभिवादन कार्यक्रमात बोलताना केले.

वैजापूर सायकलिस्ट व स्वीमिंग ग्रुपच्यावतीने शहरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, नगरसेवक स्वप्नील जेजुरकर, धनंजय अभंग, कुमोद जेजुरकर,  बाबासाहेब जगताप, जयराम खाडे व राजपूत यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केल्यानंतर हा ग्रुप सायकलिंगसाठी रवाना झाला.  पुढे बोलतांना राजपूत म्हणाले की, यापुढे जगात खूप पैसा व मालमत्ता असणारा व्यक्ती श्रीमंत असणार नाही तर ज्याच्याकडे आरोग्य आहे, चारित्र्य आहे तो सर्वात मोठा श्रीमंत असणार आहे. यासाठी सायकलिस्ट व स्वीमिंग ग्रुपचे ध्येय वाक्य “सायकल चालवा-आयुष्य वाढवा” स्वीमिंग करा-निरोगी रहा,” आरोग्य हीच संपत्ती” -गाडी, बंगला आपत्ती” हे ध्यानी मनी ठेऊन आरोग्य जपा असेही शेवटी राजपूत म्हणाले. 

या प्रसंगी स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन, प्रतीक देवरे,भास्कर खरात, यशवंत घोत्रे,  बाबासाहेब निमसे, मधुकर तांबे, जयराम खाडे, संतोष डमाळे, बाबा वारकर व ग्रुप उपस्थित होता. शेवटी जगताप यांनी आभार मानले व ग्रुप रवाना झाला.