वैजापूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

वैजापूर ,२८ मे /प्रतिनिधी :-स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांना जयंती निमित्त नगर पालिकेच्या वैजीनाथ वाचनालयात जेष्ठ नागरिक व वाचक वर्गाच्यावतीने शनिवारी आदरांजली अर्पण करून त्यांच्या राष्ट्रभक्ती व राष्ट्रनिष्ठेला अभिवादन करण्यात आले.

जेष्ठ नागरिक वैजीनाथआप्पा मिटकरी यांनी सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. जेष्ठ वाचक बबनराव क्षीरसागर, सुभाष चाफेकर,पोपट बागुल, केशव क्षीरसागर, प्रवीण देशपांडे, कचरू बसवेकर संजय राजपूत, नितीन शिंदे, धोंडीरामसिंह राजपूत यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम राजपूत यांनी वि.दा.सावरकर यांच्या जीवनावर व कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. ग्रंथपाल एस.व्ही.राजपूत यांनी आभार मानले.