वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे 27 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमीपूजन व लोकार्पण

वैजापूर ,४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे विविध विकास कामांसाठी आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या स्थनिक विकास निधीतून 27 लक्ष रुपये मंजूर झाले असून, या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आ. बोरणारे यांच्या हस्ते शुक्रवारीकरण्यात आले.

“श्री संत शंकरस्वामी महाराज” संस्थान परिसरात 10 लक्ष रुपये पेव्हर ब्लॉक बसविणे कामांचे लोकार्पण, गावअंतर्गत सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ता 10 लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन,श्री संत शंकरस्वामी महाराज” संस्थान परिसरात 7 लक्ष रुपये पेव्हर ब्लॉक बसविणे अशा एकुण 27 लक्ष रुपये खर्चाच्या  विविध विकास कामांचे आज जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत व  आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते भूमिपूजन व लोकार्पण झाले.शिवसेना पक्षाच्यावतीने आयोजित शिवसंवाद मेळावा, आरोग्य शिबिर व शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटनही यावेळी आ.बोरणारे यांच्या हस्ते  करण्यात आले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेरखान, जे. के.जाधव, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख खुशालसिंग राजपूत, तालुकाप्रमुख सचीन वाणी, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रामहरीबापू जाधव, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा लताताई पगारे, नगरपालिकेतील गटनेते प्रकाश पाटील चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ.अंबादास दानवे,आ.बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, जे.के.जाधव आदींची यावेळी समयोचित भाषणे झाली.कार्यक्रमास शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कल्याण पाटील जगताप, बाळासाहेब जाधव, पी.एस.कदम, मोहन पाटील साळुंके, बबनराव जाधव, बाजार समितीचे माजी उपसभापती राजेंद्र पाटील चव्हाण, गोकुळ पाटील आहेर, भाजपचे सुनिल पैठणपगारे, बापूभैय्या साळुंके, विभागप्रमुख प्रभाकर जाधव, नंदूभाऊ जाधव, भिकन सोमासे, उपविभागप्रमुख चांगदेव जाधव, अरुण मगर, संजय पवार, सरपंच  राजश्री जाधव, राजेंद्र जाधव, चांगदेवआप्पा जाधव, सुभाष पाटील कदम,दिलीप जाधव, चंद्रकांत पवार, प्रभाकर सोनवणे, उपसरपंच रामेश्वर जाधव, बाबासाहेब राऊत, भरत साळुंके, विजय मगर, संदीप पवार, काकासाहेब गायकवाड, नितीन चुडीवाल, शिरीष चव्हाण, बाबासाहेब राऊत, बाळनाथ मुळे, नरेंद्र सरोवर, विठ्ठल डमाळे, योगेश शिंदे, अनिल भोसले, सुनील शिरोडे, मंगेश जाधव, रामेश्वर साळुंके , संदीप गायकवाड व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.