वैजापूर शहरात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

वैजापूर ,६ जून/ प्रतिनिधी :- हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा मंगळवारी (ता.06) शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शहरातील शहरवासीयांच्या उपस्थितीत आनंद व उत्साहात हा सोहळा साजरा झाला. 

आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक व जलाभिषेक करण्यात येऊन आसनावर पुतळा स्थापित करण्यात आला. तसेच आरती होऊन जय घोष करण्यात आला. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी तात्कालीन शिवराज्याभिषेक सोहळ्याची माहिती दिली. आ.रमेश पाटील बोरणारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण कामासाठीसाठी एक कोटी दहा लक्ष रुपयांचा निधी तर महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळा परिसर सुशोभीकरणला पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे यावेळी आभार मानण्यात आले.

या प्रसंगी आयोजक शिवसेना शहर प्रमुख पारस घाटे, प्रवीण कोतकर, प्रेम राजपूत, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे शैलेश चव्हाण, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, अंकुश हिंगे, निवर्तमान नगरसेवक डॉ. निलेश भाटिया, दशरथ बनकर, इम्रान कुरेशी, उल्हास ठोंबरे, संजय बोरणारे, अमोल बोरणारे, अशोक पवार , प्रशांत त्रिभुवन, युवा सेनेचे श्रीकांत शिंदे, काशीराम राजपूत, महेंद्र काटकर, भगवान साळुंके आदी उपस्थितीत होते. या प्रसंगी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथ जाधव, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप, डॉ. राजीव डोंगरे यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन छत्रपती महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.