माजी आमदार स्व.आर.एम.वाणी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त युवासेनेतर्फे रक्तदान शिबीर

वैजापूर,​१ सप्टेंबर​  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्याचे माजी आमदार, लोकनेते स्व.आर.एम.वाणी यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त युवासेना शाखेतर्फे गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदात्यांनी स्वतःहून रक्तदान करून स्व. वाणी यांना अभिवादन केले.

याप्रसंगी शिवसेनेचे जेष्ठ नेते आसाराम पाटील रोठे, उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे, किसान सेना जिल्हाप्रमुख संजय पाटील निकम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनाजी पाटील मिसाळ, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रकाश चव्हाण, देविदास  वाणी,  माजी नगरसेवक लिमेश वाणी,उपतालुकाप्रमुख मोहनराव साळुंके, विभागप्रमुख नंदकिशोर जाधव, मा.उपसभापती आनंद निकम,पंचायत समिती सदस्य विनायक गाढे, रवींद्र कसबे, अनिल भोसले, सरपंच दौलत गायकवाड, तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे, गणेश धारबळे, अनिल न्हावले पाटील, युवासेना तालुकाप्रमुख विठ्ठल डमाळे, गोरख गावडे, अक्षय साठे, राहुल साळुंके, संकेत वाणी, ऋषिकेश राजपूत, कृष्णा धारबळे, शाम गावडे, बाबासाहेब महाजन, राहुल जगताप, अजय वाणी, कृष्णा पाटोळे, सचिन गावडे, उत्कष अनर्थे, गोरख धारबळे व शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.