मनूर येथे खारी नदीवर 40 लक्ष रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचे आ.बोरणारे यांच्या हस्ते भूमीपूजन

Displaying IMG-20220112-WA0226.jpg

वैजापूर तालुक्यातील मौजे मनुर येथे आमदार रमेश पाटील बोरनारे यांच्या प्रयत्नाने एफडीआर ( FDR ) अंतर्गत मनुर-भोकरगाव या रस्त्यांवर असलेल्या खारी नदीवरील पुल बांधकामासाठी 40 लक्ष रुपयांचा निधी मंजुर झाला असून याकामाचे भूमिपूजन बुधवारी आमदार रमेश पाटील बोरनारे यांच्या हस्ते करण्यात आले.

Displaying IMG-20220112-WA0227.jpg


याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रामहरीबापू जाधव, सार्वजनिक बांधकाम व8भागाचे उपकार्यकारी अभियंता एस.बी.काकड, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बबनराव जाधव, नारायणराव भोपळे, गोकुळ पाटील आहेर, विभागप्रमुख नंदकुमार जाधव, प्रभाकर जाधव, उपविभागप्रमुख अंबादास मामा खोसे, संतोष मामा दौंगे, भानुदास पिंपळे, सरपंच राजू साळुंके, नवनाथ राऊत, सुभाष पाटील कदम, प्रभाकर सोनवणे, संजय पाटील पवार, पिंटू काका तुपे, चंद्रकांत पवार, दिलीपकाका जाधव, बाबासाहेब राऊत, राजेंद्र पाटील निकम, साईनाथ ढोबले, संतोष साळुंके, गोरख चव्हाण, गणेश साळुंके, शासकीय गुत्तेदार रमेश जाधव, किरण काकडे, नितीन साळुंके यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.