वैजापूर येथील नदीकाठच्या श्रीराम मंदिर जिर्णोद्धार कामाचे आ.बोरणारे यांच्या हस्ते भूमीपूजन

वैजापूर ,१ एप्रिल  / प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील परदेशी मढी जवळील श्रीराम मंदिराचे जिर्णोद्धार कामासाठी 30 लाख रुपयांचा निधी नगरविकास विभागाअंतर्गत योजनेतून मंजूर करण्यात आला असून या कामाचे भूमीपूजन आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते झाले.

श्रीराम जन्मोत्सवाचे औवचित्य साधून श्रीराम मंदिर (नदीकाठचे) जिर्णोद्धाराच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.राज्य शासनाच्या नगरविकास विभागांतर्गत वैजापूर शहरातील विकास कामासाठी आतापर्यंत जवळपास 65 कोटी रुपयांचा निधी आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे. या निधीतून 30 लाख रुपयांचा निधी श्रीराम मंदिर जिर्णोद्धार कामासाठी मंजूर आहे. 

 या भूमीपूजन कार्यक्रमास उपनगराध्यक्ष साबेरभाई, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, नगरपालिका अभियंता प्रकाश पाटील, शहरप्रमुख पारस घाटे, नगसेवक दशरथ बनकर, डॉ. निलेश भाटिया, गणेश खैरे, ज्ञानेश्वर टेके, गोकुळ भुजबळ, प्रमोद कुलकर्णी, लक्ष्मण वैष्णव, महेश भालेराव, शंकर जोरे, अक्षय कुलकर्णी आदी उपस्थित होते.