वैजापूर तालुक्यातील 25 गावांसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 9 कोटी 14 लाखाचा निधी मंजूर ; ग्रामस्थांतर्फे आ.बोरणारे यांचा सत्कार

वैजापूर ,१८ जानेवारी / प्रतिनिधी :- जलजीवन मिशन योजनेअंतर्गत वैजापूर – गंगापूर विधानसभा मतदार संघातील 25 गावांसाठी 9 कोटी 14 लाख 65 हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.शासनाकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणल्याबद्दल आ.रमेश पाटील बोरणारे यांचा तालुक्यातील घायगांव, सुराळा, डवाळा व नागमठाण ग्रामपंचायतीच्यावतीने मंगळवारी सत्कार करण्यात आला.

आ.बोरणारे यांनी राज्याचे पाणीपुरवठामंत्री  गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नामुळे पाणीपुरवठा विभागाच्या  जलजीवन मिशन योजनेअंतर्गत वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघातील 25 गावांसाठी 9 कोटी 14 लाख 65 हजार रुपये भरघोस असा निधी मंजूर झाला. पाणीपुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करून आणल्याबद्दल तालुक्यातील घायगाव, सुराळा, डवाळा, नागमठाण गावाच्यावतीने आमदार बोरनारे यांचा सत्कार करून सर्व गावातील प्रमुख सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी मा.नगराध्यक्ष साबेरभाई, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, उपतालुकाप्रमुख कल्याण पाटील जगताप, महेश पाटील बुनगे, मोहनराव साळुंके, गोकुळ पाटील आहेर, विभागप्रमुख नानासाहेब थोरात, बंडू पाटील जगताप, उपविभागप्रमुख हरिभाऊ साळुंके, रणजीत  चव्हाण,विजय काळे, रामनाथ तांबे, रामभाऊ बारसे, राजुभाऊ राजपूत, राजेंद्र बावचे, दादासाहेब साळुंके, अशोक साळुंके, प्रविण धने, विकास गायकवाड, अमोल बावचे, शरद जाधव, सोमनाथ साळुंके, सोन्याबापू साळवे, सुदाम आढाव, साईनाथ बावचे यांच्यासह गावातील प्रमुख नागरीक उपस्थीत होते.