स्व.डॉ.अनिल जोशी यांच्या स्मरणार्थ सर्वरोगनिदान शिबिरात 388 रुग्णांची तपासणी

वैजापूर ,६ जून/ प्रतिनिधी :- वैजापूर येथील दिवंगत विष्णुपंत जोशी चॅरिटेबल ट्रस्ट, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय हॉस्पिटल व शासकिय दंत महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे सावित्रीबाई फुले विद्यालय येथे दिवंगत डॉ. अनिल विष्णुपंत जोशी यांच्या स्मरणार्थ आयोजित सर्व रोग, निदान, उपचार व औषधी वाटप शिबिरात विविध आजाराच्या ३८८ रुग्णांची डॉक्टरांनी मोफत तपासणी केली. तसेच उपचार करुन औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. 

स्व.डॉ.अनिल जोशी

या शिबिराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते मेजर सुभाष संचेती, आमदार रमेश बोरनारे, नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, डॉ. व्ही. जी. शिंदे, डॉ. राजीव डोंगरे, मर्चंटचे चेअरमन विशाल संचेती,  राजुसिंह राजपूत, ज्योती जोशी, अंजली जोशी, शकुंतला संचेती यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. आमदार रमेश बोरनारे व नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांनी या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. या शिबिरात रक्तसंकलनही करण्यात आले. ॲड.‌समीर जोशी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले. 

डॉ.‌अश्विन जोशी, सचिन जोशी, ॲड.समीर जोशी व अमृता जोशी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.‌ सुधीर लालसरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाऊसाहेब ठोंबरे, डॉ. सुभाष भोपळे, दशरथ बनकर, प्रशांत कंगले, डॉ. निलेश भाटिया, विजय वेद, स्वप्निल जेजुरकर, डॉ.नितेश शहा, सुरेश तांबे, प्रशांत त्रिभुवन, गिरीश भालेराव, सोमन लालसरे, रोहित जोशी, पुरुषोत्तम पवार आदी उपस्थित होते.