खंडाळा येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

वैजापूर ,६ जून/ प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. गणेश रामदास पवार (वय ३३, रा. खंडाळा) असे आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण लगेच करू शकले नाही. घराच्या छताला गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले.

या प्रकरणी येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीवरुन वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक मोईस बेग हे करीत आहेत.