वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात जागतिक हिवताप दिन निमित्त रुग्णांचे प्रबोधन

वैजापूर ,२५ एप्रिल  / प्रतिनिधी :- येथील उपजिल्हा रुग्णालयात जागतिक हिवताप दिन निमित मंगळवारी (ता.25) जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांच्या उपस्थितीत रुग्णांना या आजारची माहिती देण्यात आली. जिल्हा  हिवताप अधिकारी रविंद्र ढोले व वैजापूर उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गजानन टारपे यांच्या मार्गदर्शनाखाली राजपूत यांनी रुग्णांना तीव्रताप असल्यास,रक्ताच्या उलट्या होत  असल्यास व डोळे दुखत असल्यास तपासणी व उपचार घेण्याचा सल्ला दिला. माठ, हौद ,झाकुन ठेवा, गप्पी मासे पाण्यात सोडा, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा असे आवाहन केले. 

या प्रसंगी,वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश आंधळकर, डॉ.सचिन चव्हाण, विजय पाटील, श्याम उचित, मंगेश मापारी, रामेश्वर नारले, राम सोनूने, परिचारिका श्रीमती कूळसकर, गावीत सिस्टर, शीतल तळेकर, मयुर त्रिभुवन, संजय शिराळे, अरुण पाटील, विजय मगरे आदी उपस्थित  होते.