वैजापूर पोलिस ठाण्यातील गोपनीय शाखेचे संजय घुगे यांचा पोलीस महासंचालक पदकाने गौरव

वैजापूर, ११ मे  /प्रतिनिधी :- वैजापूर पोलिस ठाण्यातील गोपनीय शाखेचे पोलिसनाईक संजय घुगे यांचा उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस महासंचालक पदकाने गौरव करण्यात आला. महाराष्ट्रदिनी राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुभाष देसाई यांच्या हस्ते त्यांना महासंचालक पदक प्रदान करून गौरविण्यात आले.

औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलातील 16 पोलिस अधिकारी व अंमलदारांना यंदा नामांकन प्राप्त झाले होते.पोलीस महासंचालक पदक मिळाल्याबद्दल संजय घुगे यांचे मुंबईचे पोलिस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, पवन बनसोड, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती, पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, व्यापारी संघटनेचे प्रकाशसेठ बोथरा, काशीनाथ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत, राजू काझी यांच्यासह सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.