जरुळ येथे झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

वैजापूर,५ एप्रिल  /प्रतिनिधी :- झाडाला गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना जरुळ (ता. वैजापूर) येथे मंगळवारी (ता.5) सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. गणेश भाऊसाहेब राऊत (वय २८) असे मृताचे नाव आहे.

जरुळ शिवारातील शेत गट क्रमांक १५० मधील शेतवस्तीवर राहत्या घरासमोर लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पंचायत समिती सदस्य सुरेश राऊत यांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. सहायक पोलिस उपनिरीक्षक रज्जाक शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.