नांदेडमध्ये 99 बाधितांची भर तर तीन जणाचा मृत्यू

नांदेड दि. 12 :- 12 ऑगस्ट रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यात 147 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 99 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 62 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 37 बाधित आले.

आजच्या एकुण 610 अहवालापैकी 491 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 3 हजार 617 एवढी झाली असून यातील 2 हजार 56 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 414 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 169 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

10 ऑगस्ट रोजी देगलूर नाका नांदेड येथील 75 वर्षाचा एक पुरुष खाजगी रुग्णालयात, 12 ऑगस्ट रोजी किनवट तालुक्यातील लोणी येथील 60 वर्षाची एक महिला, लाईन गल्ली देगलूर येथील 50 वर्षाची एक महिला यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णूपुरी येथे उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 129 एवढी झाली आहे.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील 2, नायगाव कोविड केअर सेंटर येथील 9, देगलूर कोविड केअर सेंटर 11, खाजगी रुग्णालय 8, बिलोली कोविड केअर सेंटर 4, भोकर कोविड केअर सेंटर 1, हदगाव कोविड केअर सेंटर 10, मुखेड काविड केअर सेंटर 17, पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथे 69,शासकीय आयुर्वेदिक महाकोविड केअर सेंटर 14, किनवट कोविड केअर सेंटर 1, औरंगाबाद येथील संदर्भित 1 अशा एकूण 147 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 18, लोहा तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 8, बिलोली तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 1, दिल्ली 1, नांदेड ग्रामीण 4, मुखेड तालुक्यात 18, उमरी तालुक्यात 1, हदगाव तालुक्यात 5, धर्माबाद तालुक्यात 3, यवतमाळ 1 असे एकुण 62 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे मुखेड 6, भोकर तालुक्यात 3, मुदखेड तालुक्यात 11, धर्माबाद तालुक्यात 4, नांदेड ग्रामीण 3, देगलूर तालुक्यात 8, उमरी तालुक्यात 2 एकूण 37 बाधित आढळले.

जिल्ह्यात 1 हजार 414 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीसर्वेक्षण- 1 लाख 50 हजार 123,घेतलेले स्वॅब- 24 हजार 867,निगेटिव्ह स्वॅब- 19 हजार 13,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 99,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 3 हजार 617,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 8,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,एकूण मृत्यू संख्या- 129,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 2 हजार 56,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 414,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 741, आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 169.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *