वैजापूर शहरात “एक गाव- एक जयंती” ने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

वैजापूर,१४ एप्रिल  /प्रतिनिधी :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गुरुवारी शहर व तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे शहरातील विविध भागांतील नागरिकांनी वेगवेगळी मिरवणूक न काढता “एक गाव – एक जयंती” ने मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यापूर्वी शहरातील विविध भागांतील जयंती समित्यांकडून वेगवेगळी मिरवणूक काढून साजरी केली जात असे.  मात्र यावर्षी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील आंबेडकरनगर, इंदिरानगर, रमाई चौक, दुर्गानगर या भागातील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वेगवेगळी साजरी न करता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचधातूंच्या नवीन पूर्णाकृती पुतळा परिसरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून “एक गांव – एक जयंती” साजरी केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, उपाध्यक्ष आ,रमेश पाटील बोरणारे, सचीव मा. नगराध्यक्ष साबेरखान, नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर,  काँग्रेस नेते भाऊसाहेब पाटील ठोंबरे
व नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी यांनी यात पुढाकार घेतला व जयंती उत्सव उत्साहात साजरा झाला.    शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी व विविध भागांतील नागरिकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.याप्रसंगी दलीतमित्र डॉ.व्ही.जी.शिंदे, मर्चंट बँकेचे अध्यक्ष विशाल संचेती, नगरसेवक उल्हास ठोंबरे, प्रमोददादा जगताप, हाजी शेख अकिल ,सावन राजपूत, शैलेश चव्हाण, रवींद्रआप्पा साखरे, बाबासाहेब गायकवाड, धोंडीरामसिंह राजपूत, पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत, पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, बाळासाहेब चव्हाण, आबासाहेब जेजुरकर,अण्णासाहेब ठेंगडे, दिलीप अनर्थे, स्वप्नील जेजुरकर, राजेश गायकवाड, पारस घाटे, नगरसेविका संगीता गायकवाड, दिनेश राजपूत, कृषी अधिकारी एच.आर.बोयनर, साहेबराव पडवळ, विजय त्रिभुवन, संतोष त्रिभुवन, अमोल अस्वले, सागर अस्वले, संतोष त्रिभुवन, भास्कर त्रिभुवन यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातच भीम गीते सादर करण्यात आली. पुतळा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.