वैजापूर जैनस्थानकात राष्ट्रसंत आचार्य पुलकसागरजी महाराज यांचे प्रवचन ; तीन दिवसीय ज्ञानगंगा महोत्सव

वैजापूर, १७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- नदीचे पाणी प्रवाहाचे पाण्यातील अशुद्धीला काठावर लावून पात्र निर्मळ करते त्या प्रमाणे संत वाणी, विचार व संस्काराचे आचरण प्रवाहात येणाऱ्या माणसांचे विचार शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाहीत असा उपदेश जैन मुनी राष्ट्रसंत आचार्य पुलकसागरजी महाराज यांनी केला. वैजापूर येथील जैन स्थानक येथे 16 ते 18 नोव्हेंबर दरम्यान तीन दिवसीय ज्ञानगंगा महोत्सवाचे पहिल्या दिवस प्रवचनात त्यांनी उपस्थित श्रावक- श्राविकांना संबोधित केले. 

राष्ट्रसंत आचार्य पुलकसागरजी महाराज व ससंग यांचे बुधवारी सकाळी वैजापूर शहरात आगमन झाले. भव्य शोभायात्रेने व हजारों भक्तांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, उद्योगपती जिवनलाल संचेती, उपनगराध्यक्ष साबेरखान, माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती, उपजिल्हाप्रमख बाबासाहेब जगताप, संजय बोरणारे, उद्योजक शांतीलाल पहाडे, कृषी अधिकारी विजय कासलीवाल, ॲड.एस.एस ठोळे, ॲड.प्रमोद जगताप, नगरसेवक दशरथ बनकर, स्वप्नील जेजूरकर, शहराध्यक्ष दिनेश राजपूत, धोंडीरामसिंग राजपूत, बाबूलाल संचेती, शोभाचंद संचेती, प्रकाश बोथरा, डॉ.संतोष गंगवाल, विजय ठोळे, राजमल पाटणी, सुभाष बोहरा, नितीन चुडीवाल, राजेंद्र पारख, निलेश पारख, चिंतामण गवळी, पियूष पाटणी, शीतल लोहाडे तसेच सकल जैन समाज व सर्वधर्मीयांची उपस्थिती होती.

सूर्य ज्याप्रमाणे प्रांत, धर्म, जात, पंथ व भाषा असा कुठलाही भेदभाव न करता निःस्वार्थ पणे सर्वांना प्रकाश देण्याचे कार्य करतो त्याचप्रमाणे संत देखील समाजाला ज्ञानरुपी प्रकाश देण्याचे कार्य करत असल्याचे त्यांनी प्रवचनात सांगितले.प्रवचन माला ही 16 ते 18 नोव्हेंबर दरम्यान सकाळी 8.30 ते 9.30 वाजेदरम्यान येथील जैन स्थानक येथे होणार आहे. या प्रवचन मालेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.