मरणोत्तर नेत्रदान काळाची गरज- डॉ.संतोष संघवी

वैजापूर ,११ जून  /प्रतिनिधी :-जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त येथील सुमनंजली नेत्रालय येथे शुक्रवारी (ता.10) नेत्रतज्ञ डॉ.संतोष संघवी यांनी उपस्थित नेत्ररुग्णांना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी या विषयी सविस्तर मार्गदर्शन करून मरणोत्तर नेत्रदान करून समाजाचे ऋण फेडावे असे आवाहन केले.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत यांनी मरणोत्तर दृष्टीदान ही सामाजिक चळवळ व्हावी म्हणून रुग्णांनाआवाहन केले की,आपण देह सोडल्या नंतर म्हणजे मरणोत्तर दृष्टीदान करून अंधाना हे जग पाहण्याची संधी देऊ शकतो या साठी मरणोत्तर दृष्टीदान करून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी दृष्टीदात्यांनी पुढे यावे व मरणोत्तर समाज सेवा करून समाज ऋण फेडावे. या प्रसंगी बरेच रुग्ण यांनी मरणोत्तर दृष्टी दान करण्याचा संकल्प सोडला.डॉ.संतोष संघवी यांनी यात पुढाकार घेऊन रुग्णांना मरणोत्तर नेत्रदान साठी प्रवृत्तकरण्याचा संकल्प केला. या प्रसंगी आराधना शेलार वरुग्णालयातिल कर्मचारी यांनीही मरणोत्तर दृष्टीदान साठी सर्वंकष प्रयत्न करू असे आश्वासन दिले.