3 लाख रुपये किंमतीची ट्रॅक्टरची हायड्रोलीक ट्रॉली व साहित्य चोरून 20 हजारात विक्री ; दोघांना अटक

वैजापूर पोलिसांची कारवाई

वैजापूर,११ डिसेंबर /प्रतिनिधी :-शेतातील ट्रॅक्टरची हायड्रॉलीक ट्रॉली, कल्टीव्हेटर व  नांगर असे एकूण 3 लाख 15 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून ते 20 हजारात विक्री केल्याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

देवसिंग सुभाष गोमलाडू (वय28 वर्ष, रा.बेंदवाडी) याने वैजापूर तालुक्यातील करंजगांव शिवारातील शेत गट क्र 12 मधील ज्ञानेश्वर दांगोडे यांच्या शेतातील 1 लाख 95 हजार रुपये किंमतीची ट्रॅक्टरची हायड्रॉलिक ट्रॉली,;45 हजाराचे कल्टीव्हेटर व 75 हजार रुपये किमतीचे नांगर असे एकूण 3 लाख 15 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून ते कन्नड तालुक्यातील बालखेडा येथील सुरेश कोठावळे (वय 25 वर्ष) यास 20 हजाराला विक्री केल्याची माहिती खबऱ्याकडून  पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिस निरीक्षक साम्राटसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदाम भागवत, पोलिस नाईक मोईस बेग, सहाय्यक फौजदार हुकूमसिंग डांगर, पो.कॉ. पंकज गाभूड यांच्या पथकाने शुक्रवारी पहाटे सुरेश कोठावळे याला बालखेडा येथून तर देवसिंग गोमलाडू यास बेंदवाडी येथून ताब्यात घेतले व चोरीला गेलेले संपूर्ण साहित्य त्यांच्या ताब्यातून जप्त केले. आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.