कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य वैजापूर तालुका शिवसेनेतर्फे निदर्शने व निषेध

वैजापूर,१९ डिसेंबर /प्रतिनिधी :- बंगळूर येथे समाजकंटकाकडून झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना व त्याविषयी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्याचा वैजापूर तालुका शिवसेनेतर्फे रविवारी येथे निदर्शने करून निषेध करण्यात आला.

बंगळुरात समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची विटंबना केली या घटनेविषयी बोलतांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही क्षुल्लक बाब असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले असून, वैजापूर येथील शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक परिसरात शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते तथा माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सचिन वाणी, शहराध्यक्ष राजेंद्र पाटील साळुंके, भाऊसाहेब पाटील गलांडे, पारस घाटे, बाळासाहेब जाधव, पारस घाटे, अमोल बोरणारे, युवा सेनेचे आमेर अली, श्रीकांत  साळुंके, संदीप गायकवाड, रय्यस चाऊस, शैलेश चव्हाण, उमेश गायकवाड, कैलास वाणी, राम निकम, शंकरराव मुळे, दीपक बोर्डे, संतोष लोखंडे, पप्पू लांडे, उमेश नाईकवाडी,बळीराम राजपूत, वसंत त्रिभुवन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.