ओबीसी आरक्षणाबाबत चुकीची माहिती दाखवली ; वैजापूर येथे ओबीसी समाज बांधवांनी बैठक

वैजापूर ,११ जून  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील ओबीसी आरक्षणाबाबत आवश्यक आसलेली माहिती ( इंपीरिकल डाटा) जाणीवपुर्वक चुकीची दाखविण्यात आल्याबाबत चर्चा करण्यासाठी आज सायंकाळी 5.00  वाजता वैजापूर येथे ओबीसी समाज बांधवांनी बैठक झाली. 
शहरातील माळी समाजाचे कार्यकर्ते प्रकाश माळी यांच्या निवासस्थानी झालेल्या या तातडीच्या बैठकीत नाशिक येथील समता परिषदेचे नेते रविभाऊ सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. माळी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ गायकवाड, भाजपचे नगरसेवक दशरथ बनकर, सुरजनाना पवार व युवासेनेचे श्रीराम गायकवाड यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत तालुक्यातील ओबीसी आरक्षणाबाबत जाणिवपूर्वक चुकीची माहिती दाखविल्यात आल्याबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस काशिनाथ गायकवाड, दशरथ बनकर, सुरज नाना पवार, नगरसेवक स्वप्नील जेजुरकर, युवासेनेचे श्रीराम गायकवाड, बद्रीनाथ गायकवाड,   प्रकाश माळी, द्मानेश्वर घोडके, सुनील गायकवाड द्मानेश्वर आदमाणे, सलीमभाई तांबोळी, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, धनंजय अंभंग, बाळासाहेब शिदे, जगन्नाथ गायकवाड, पुंडलिक गायकवाड, आबासाहेब जेजूरकर यांच्यासह ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.