मोदी सरकारची आठ वर्ष; लोह्यात प्रविण पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात मोटारसायकल रॅली; राज्यसभा विजयी जल्लोष

लोहा : देशाचे खंबीर नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप  प्रणित सरकारला 8 वर्षे पूर्ण झाली तसेच जिल्ह्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर याना खासदार म्हणून तीन वर्षे झाले आहेत. तसेच १० जून रोजी झालेल्या राज्यसभा निवडणूकीत भाजपाने विजय संपादन केला. त्याबद्दल शहरात युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोटारसायकल रॅली व फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली. यावेळी भाजपायुमो जिल्हाध्यक्ष ऍड.किशोर देशमुख यांनी विशेष उपस्थिती होती.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या यशस्वी आणि पारदर्शक सरकारला 8 वर्षे पूर्ण तसेच  नांदेड जिल्ह्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या खासदार 3 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशाचे भाजप युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष खा.तेजस्वी सुर्या यांच्या नेतृत्व, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील,  भाजपा सरचिटणीस युवानेते प्रविण पाटील चिखलीकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख  यांच्या नेतृत्वाखाली लोह्यात भव्य रॅली काढण्यात आली.नगर परिषद कार्यालय ते छत्रपती शिवाजी चौक लोहा या मार्गावर मोटारसायकल रॅली निघाली. यात घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. माजी नगराध्यक्ष व भाजपा शहराध्यक्ष किरण सावकार वट्टमवार, भाजपा तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील शिंदे, कंधार तालुकाध्यक्ष भगवान राठोड,  माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, उपनगराध्यक्ष  नगरसेवक छत्रपती धुतमल,  उपनगराध्यक्ष दत्ता वाले, भास्कर पवार, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित पाटील, कंधार शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार, कंधार माजी नगराध्यक्ष चेतन केंद्रे, नगरसेवक नारायण  येलरवाड, युवा नेते सचिन मुकदम, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अध्यक्ष बंडू पाटील वडजे, शंकरराव ढगे, तालुकाध्यक्ष साईनाथआप्पा कोळीगीरे, माजी जि.प.सदस्य चंद्रमुनी मस्के,  अनिल धुतमल, मधुकरराव डांगे, सुरेश गायकवाड, माधव पाटील डोंगरगावकर, प्रविण धुतमल, भानुदास पाटील पवार, तालुका उपाध्यक्ष अभंग गाडेकर, भाजपा विद्यार्थी मोर्चाचे तालुकाध्यक्ष  बाळू पाटील कदम, आर.आर. पाटील पार्डीकर, अपाराव पवार विजय केंद्रे, नाना तिडके, अविनाश पाटील पवार, सोनू महाबळे, बंटी देशमाने, अंबादास जागीरदार, किरण डोईफोडे, धीरज जोंधळे, मनोज गवारे, विजय केंद्रे, हणमंत धुळगंडे, विजय पाटील पवार, मधुसूदन डांगे, कैलास नवघरे यासह सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख सर्व पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी यात सहभागी झाले होते. राज्यसभा निवडणुकीत भाजपने मिळविलेल्या विजयाबद्दल शहरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली  पेढे वाटून आंदोत्सव साजरा करण्यात आला.