वैजापूर जायंट्स सहेलीच्या अध्यक्षपदी विद्या चापानेरकर तर यंग सहेलीच्या अध्यक्षपदी डॉ.साक्षी मुगदीया यांची निवड

संतोषी भालेराव व अनघा आंबेकर फेडरेशनवर

वैजापूर ,२३ एप्रिल  / प्रतिनिधी :- जायंट्स वैजापूर सहेलीच्या अध्यक्षपदी विद्या चापानेरकर व यंग सहेलीच्या अध्यक्षपदी डॉ. साक्षी मुगदिया यांची निवड करण्यात आली. वैजापूरमधून संतोषी भालेराव व अनघा आंबेकर यांची फेडरेशनवर नियुक्ती झाली आहे. जायंट्स ग्रुपला वैजापूरला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नगरपालिकेच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत शपथविधी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विद्या चापानेरकर व त्यांच्या सहकाऱ्यांना शपथ देण्यात आली.

या वेळी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, वैजापूर उपविभागाच्या सहाय्यक पोलिस अधिक्षक महक स्वामी, जायंट्स फेडरेशनचे विशेष समिती सदस्य विनोद शेवतेकर, माला मालाणी, फेडरेशन दोन ब चे अध्यक्ष जगन्नाथ साळुंके, सचिव राजपूत, राजेंद्र चव्हाण, नरेश गुप्ता, नांदगावचे नितिन गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जायंट्स ग्रुपची स्थापना 1998 मध्ये वैजापूर शहरात करण्यात आली. तेव्हापासून ग्रुपने सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रम हाती घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे असे प्रतिपादन जायंट्स ग्रुपच्या संस्थापक अंजली जोशी यांनी केले. सहेली ग्रुपतर्फे तसेच उमेश व प्रवीणा वाळेकर यांच्यातर्फे अंजली जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मंजिरी खैरे व अबोली राका यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जितेंद्र चापानेरकर, मंदा तांबे, सविता संचेती, विद्या वाळेकर यांनी सहकार्य केले.