माजी आमदार स्व.आर.एम.वाणी यांच्या अस्थींचे प्रयागराज त्रिवेणी संगमात विसर्जन

वैजापूर,४ एप्रिल  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्याचे माजी आमदार, लोकनेता  स्व.आर.एम.वाणी यांच्या अस्थींचे विसर्जन अलाहाबाद येथे प्रयागराज त्रिवेणी संगमात 29 मार्च रोजी करण्यात आले. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात वाणी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते.
प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर गंगा- यमुना – सरस्वती या नद्यांच्या संगमावर वाणी यांच्या कुटुंबीयांनी विधिवत पूजा करून अस्थींचे विसर्जन केले. अस्थी विसर्जनास स्व.आर.एम.वाणी यांच्या पत्नी सुमनताई वाणी, मुलगा माजी नगरसेवक लिमेश वाणी, लता लिमेश वाणी,चतुर्थी वाणी व चंचल मते आदी उपस्थित होते.