“माझी वसुंधरा अभियान” वैजापूर नगरपालिका विभागात प्रथम ; दीड कोटींचे बक्षीस

वैजापूर ,​५​ जून/ प्रतिनिधी :- पृथ्वी, वायू,जल, अग्नी,आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित “माझी वसुंधरा अभियान-3.0” वर्ष 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत ज्या नगरपालिकांनी वृक्षारोपण केले व ती वृक्ष जगविली, पर्यावरण स्वच्छता राखली, पर्यावरण प्रदूषण होऊ दिले नाही, कचरा विल्हेवाट व्यवस्थित केले, नागरिकांचा सहभाग यात उत्कृष्टरित्या मिळविला व “माझी वसुंधरा – मी वसुंधरेचा” हे सूत्र पाळून वसुंधराची योग्य अशी निगा राखली यात वैजापूर नगरपालिकेने वरील सर्व बाबींचे योग्य पालन व अंमलबजावणी केली यास्तव राज्यातील 411पालिकात औरंगाबाद विभागात वैजापूर पालिकेचे कार्य सर्वोत्कृष्ट ठरले यामुळे शासनाने छत्रपती संभाजीनगर विभागात फक्त वैजापूर नगरपालिकेची निवड करून पालिकेला दीड कोटी रुपयांचे बक्षीस सोमवारी (ता.05) जाहीर केले. 

“माझी वसुंधरा” अभियान यशस्वीपणे राबविण्यात नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, नगरसेवक व मुख्याधिकारी भागवत बिघोत(राजपूत) यांचा सिंहाचा वाटा आहे. पालिकेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल आ.रमेश पाटील बोरणारे, वसंत क्लबचे सचिव जफर ए.खान, स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत, साई माऊली संस्थेचे महेंद्र काटकर, राम उचित यांनी अभिनंदन केले आहे.