वैजापूर मनसेतर्फे ‘एक सही संतापाची’ मोहीम ; शेकडो लोकांनी सही करून व्यक्त केला संताप

वैजापूर ,​९​ जुलै / प्रतिनिधी :-सध्या राजकीय परिस्थिती महाराष्ट्रातील राजकारणात एक प्रकारचा चिखलच झाल्याचे दिसतेय शिवसेने पाठोपाठ आता राष्ट्रवादी देखील फुटून त्यातील बहुतांश आमदार हे भाजपमध्ये सत्तेत समाविष्ट झाले आहे सत्तेच्या लालसेपोटी राजकारण्यांना सर्वसामान्य मतदारांनी दिलेल्या मताच्या किमतीचे भानच राहिले नाहीये, ज्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात सही संतापाची या मोहिमेची सुरुवात केली आहे.

याच मोहिमेअंतर्गत शनिवारी (ता.08) वैजापूर पंचायत समिती समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वैजापूरच्यावतीने ‘एक सही संतापाची’ मोहीम राबवण्यात आली. यावेळी आपल्या मताला काही किंमत आहे की नाही असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्रात झालेल्या राजकारणाच्या चिखलाच्या संतापात नागरिकांना सही करण्याचे आवाहन मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले होते ज्याला प्रतिसाद देत शेकडो नागरिकांनी त्या ठिकाणी उपस्थित बॅनर वर सह्या करून संताप व्यक्त केला आहे