मणूर ते मालेगाव या रस्त्यासाठी 2 कोटी 90 लक्ष रुपये मंजूर ; आ.बोरणारे यांच्या हस्ते भूमीपूजन

वैजापूर ,२१ जानेवारी / प्रतिनिधी :- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तालुक्यातील मणूर ते मालेगाव  या पावणे चार किलोमीटर रस्त्यासाठी 2 कोटी 90 लक्ष रुपये मंजूर झाले असून, या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते शुक्रवारी शुक्रवारी झाले.जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशाने हा भूमीपूजन कार्यक्रम झाला.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेरभाई, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, जिल्हा परिषद सदस्य रामहरी बापू जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.आ.बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान यांची समयोचित भाषणे झाली.

Displaying IMG-20220121-WA0103.jpg

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा लताताई पगारे, माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण काका भोपळे,  उपकार्यकारी अभियंता श्री. बाविस्कर, उपतालुकाप्रमुख पंढरीनाथ कदम, महेश बुनगे, गोकुळ आहेर, युवासेनेचे अमीर अली, युवासेना तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत साळुंके, विभागप्रमुख प्रभाकर जाधव, उपविभागप्रमुख संतोष दौंगे, कनिष्ठ अभियंता श्री.भुजंग, श्री.शेळके, श्री.केदार, सरपंच राजेंद्र पाटील साळुंके, विलास म्हस्के, सुभाष कदम, चंद्रकांत पवार, उपसरपंच नितीन साळुंके, राजेंद्र निकम, संजय पाटील पवार, प्रभाकर सोनवणे, नवनाथ राऊत, जनार्दन काकडे, बाबासाहेब राऊत, पिंटूकाका तुपे, दिलीप काका जाधव, भानुदास पिंपळे, संतोष पाटील साळुंके, कारभारी सरोवर, गणेश साळुंके, विश्वास उगले, राजू दरेकर, युवासेना उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर ठुबे, नरेंद्र सरोवर, अक्षय कुलकर्णी, निखिल वाणी, अमोल बोरनारे, नवनाथ कदम, अभय बोडखे, कल्याण बोडखे, संजय दौंगे, दिगंबर साळुंके, साईनाथ ढोबळे, सुनिल शेळके, वाल्मिक शेजुळ, गोरख पाटील चव्हाण, विश्वास तुपे, तुकाराम आहेर, किरण सरोवर यांच्यासह  ग्रामस्थ उपस्थित होते.