वैजापूर येथे शाळकरी मुलीची छेड काढून घरावर दगडफेक:17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल


वैजापूर ,३ जून  /प्रतिनिधी :-तेरा वर्षीय शाळकरी मुलीची छेड काढून नंतर तिच्या घरावर दगडफेक करणारा रोडरोमिओ आणि त्याचे नातेवाईक अशा एकूण 17 जणांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

दगडफेक करणाऱ्यांमध्ये काही महिलांचाही समावेश आहे . नितीन पोपट होंड , अविनाश पोपट होंड , विमल पोपट होंड , राधा संतोष होंड , सुनीता सीताराम वडाळकर व अन्य 12 अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील पीडित अल्पवयीन मुलगी आठवीत शिकते. एप्रिल महिन्यात ही मुलगी शाळेतून घरी परत जात असताना नितीन होंड याने तिला अडवून मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणून तिची छेड काढली . यानंतर 31 मे रोजी दुपारी दोन वाजता पीडिता नवीन भाजीमंडई परिसरात असलेल्या संगणक केंद्रावर शिकवणीसाठी जात असताना नितीनने पुन्हा तिला अडवून तिची छेड काढली . हा प्रकार तिने तिच्या काकांना सांगितला . यावेळी त्यांनी सदर मुलास घरी जावून समजावण्याचा प्रयत्न केला. यानंतर पीडितेच्या आईने नितीन पोपट होंड , अविनाश पोपट होंड , विमल पोपट होंड , राधा संतोष होंड , सुनीता सीताराम वडाळकर व अन्य 12 जणांविरोधात फिर्याद दिल्यानंतर वैजापूर पोलिसांनी यासंदर्भात 17 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे करीत आहेत.