नगरसेवक गणेश खैरे यांची सिनेटवर नियुक्ती ; वैजापूर पालिकेत सत्कार

वैजापूर ,२४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून वैजापूर नगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक गणेश रघुनाथ खैरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा शुक्रवारी (ता.24) वैजापूर नगरपालिकेत सत्कार करण्यात आला.

फुले-आंबेडकर सभागृहात नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी व उपनगराध्यक्ष साबेरखान अमजदखान यांच्या हस्ते खैरे यांचा सत्कार करण्यात आला. पालिकेचे मुख्याधिकारी बी. यु. बिघोत, नगरसेवक सचिन वाणी, दशरथ बनकर, डॉ. निलेश भाटिया, शेख रियाज, इम्रान कुरेशी, स्वप्नील जेजुरकर, सखाहरी बर्डे, शैलेश चव्हाण, नगरसेविका डॉ. प्रीती भोपळे, मुमताजबी सौदागर आदी यावेळी उपस्थित होते.