वैजापुरात अंगणवाडी सेविकांची स्कुटी रॅली ; उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन

20 फेब्रुवारीपासून बेमुदत संपात सहभाग …काळ्या फिती लावून काम

वैजापूर ,२४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी स्कुटीवर रॅली काढून जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांची आज भेट घेतली व विविध मागण्यांचे निवेदन दिले.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पूर्व प्राथमिक शिक्षकेचा दर्जा व वेतनश्रेणी मिळावी यासाठी 20 फेब्रुवारी 2023 पासून राज्यव्यापी संपामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस  काळ्याफिती लावून करत आहे. शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील, पूर्व प्राथमिक शिक्षक भारती राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या मार्गदर्शनाखाली 20 फेब्रुवारी 2023 पासून अंगणवाडी सेविका यांचा राज्यव्यापी बेमुदत संपात महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक (अंगणवाडी) शिक्षक भारती संघटनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस काळ्या फिती लावून काम काम करून अंगणवाडीतील 3-6 वयोगटातील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप करत आहे. ग्रामपंचायत मार्फत अंगणवाडीसाठी येणाऱ्या निधीमधून अंगणवाडीमध्ये लाभार्थ्यांना आहार शिजवण्यासाठी गॅस सिलेंडर आहार शिजवण्यासाठी इतर साहित्य व पाणी नळ  जोडणी करण्यात यावी. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांची वैजापूर पंचायत समिती सभागृहांमध्ये बैठकी दरम्यान भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली व मागण्यांचे निवेदन देण्यात आले.