वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जालना तहसील कार्यालयावर बोंबाबोंब व चक्काजाम आंदोलन

जालना,२१ जानेवारी / प्रतिनिधी :-  वंचित बहुजन आघाडी जालना शहर आघाडीच्या वतीने  तहसील कार्यालयावर बोंबाबोंब व चक्काजाम आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडी जालना शहर व महिला आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या अनांगोंदी कारभाराबाबत निवेदन देण्यात आलेले होते.

सदर निवेदनात पुर्णपणे संबंधीत खात्यातील अधिकारी व त्यांच्या बेजबाबदारपणाबद्दल माहिती देण्यात आली होती. तसेच काही मागण्या आणि योजनेच्या संदर्भात होणाऱ्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. परंतु शासन स्तरावर वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा खुलासा किंवा संबधीतांवर कोणतीही कार्यवाही
संदर्भात माहिती आजपर्यंत पुरवलेली नाही.  निष्क्रीय शासनाच्या विरोधात आज तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब व चक्काजाम आंदोलन करण्यात आले.  

Displaying IMG-20220120-WA0024.jpg


मागण्या :

1. पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार श्रीमती मंगला मोरे यांची व अव्वल कारकुन यांची चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कठोर कार्यवाही करण्यात यावी.

2. ज्या-ज्या रेशन दुकानदाराकडे एकापेक्षा अधीक दुकाने आहेत अशा दुकानदारांचे अतिरिक्त दुकाने रद्द करून 33% राखीव महिलांना शासनाच्या नियमाप्रमाणे रेशन दुकाने वाटप करण्यात यावे.

3. एपीएल, बीपीएल, अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेवर धान्य देण्यात यावे.

4. लाभार्थ्यांची पात्र यादी स्वस्त धान्य दुकानात दर्शनी भागात लावण्यात यावी.

5. लाभार्थ्याने रेशन घेतल्यास डीजीटल स्वरुपाच्या पावत्या लाभार्थ्यास देण्यात याव्यात.

6. शासनाच्या नियमानुसार देण्यात येणारे रेशन प्रतीव्यक्ती नोंदणीनुसार या प्रमाणे वितरीत करण्याचे आदेश देण्यात यावे.

7. योजनेची कामे ही लाभार्थ्यांना प्रशासनामार्फतच व्हावी. त्यामध्ये मध्यस्ती, दलालामार्फत करण्यात येवू नये, असे निवेदनात नमूद केले आहे.

या आंदोलनानंतर कार्यवाही न झाल्यास आयुक्त कार्यलयासमोर औरंगाबाद येथे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी या शहराध्यक्ष कैलास रत्नपारखे, महिला शहराध्यक्षा जया आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली  विष्णु खरात, नाना जाधव, विनोद दांडगे, सुभाष आठवले, किशोर जाधव, आत्माराम यादव, अर्जुन जाधव, गौतम महस्के, मनोज शर्मा, रामदास दाभाडे, भगवान साळवे, सतिष भगवते, दयाबाई निकाळजे, मालताबाई पाटोळे, उषाबाई सोनवणे, मंदा पवार, आचल पवार, विमलताई गायकवाड, लखन चितेकर, प्रकाश भगवते आदी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते,