जालना शहरवासीयांना भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढावा अन्यथा आंदोलन- ” आम्ही जालनेकर ” मंचाची मागणी

जालना ,२१ जानेवारी /प्रतिनिधी :-औद्योगिक वसाहतीतून निघणाऱ्या विषारी वायू, धुळीच्या लोटामूळे शहरवासीयांचे धोक्यात आलेले आहे.अंबड चौफुली ते नुतन वसाहत रस्त्याची रखडलेली दुरूस्ती,  वळण रस्त्यावरील बंद पथदिवे, उघडी गटारव्यवस्था, बंद असलेल्या शैक्षणिक संस्था अशा जालना शहरवासीयांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रशासनाने तोडगा काढावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे मागण्याचे निवेदन  ” आम्ही जालनेकर ” मंचातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले 
 ” आम्ही जालनेकर ” चे मुख्य संयोजक  राजेश राऊत, संयोजक काॅग्रेसचे जेष्ठ नेते दलितमित्र बाबुराव मामा सतकर, महेंद्र रत्नपारखे, गौतम म्हस्के यांनी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांची भेट घेऊन नागरी समस्यांबाबत चर्चा केली व लक्ष वेधले. 
 _________________ 

जिल्हाधिकाऱ्यांनी त्या रस्त्याचा निधी जाहीर करावा : राऊत 
शहराचे दक्षिण प्रवेशद्वार असलेल्या अंबड चौफुली ते नुतन वसाहत हा रस्ता मागील पाच महिन्यांपासून खिळखिळा झाला असून या रस्त्याच्या दुरूस्ती साठी मंजूर असलेला निधीजिल्हाधिकाऱ्यांनी  जाहीर करावा तेव्हा खरी परिस्थिती शहरवासीयांना कळेल. अशी मागणी मंचाचे मुख्य संयोजक राजेश राऊत यांनी केली. 

_________________

पश्चिम दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे औद्योगिक वसाहतीतील धुरांच्या प्रदुषणाने जुन्या जालन्यात आकाश व रस्ते काळेकुट्ट होत आहेत. शिवाय शहरात  प्रचंड प्रमाणात धुळीचे लोट यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून दोषींविरूध्द तात्काळ कार्यवाही करावी, जिल्हा सामान्य रूग्णालय, सर्व शासकीय कार्यालये,इस्पितळे यांना जोडणारा तसेच वाहतूकीसाठी महत्त्वाचा असलेल्या अंबड चौफुली ते नुतन वसाहत ह्या रस्त्यावर जागो-जागी  मोठे खड्डे  पडले आहेत, वाहने आदळून दररोज अपघात घडत असल्याने सदर रस्ता दुरूस्ती साठी भरीव निधी ची तरतूद करून रस्ता दुरूस्त करावा, शनिमंदिर ते रेल्वे गेट या रस्त्यावर तीस वर्षांपासून  डांबरीकरण, मजबुतीकरण झाले नसून राञीच्या अंधारात वाहनधारकांना अंदाज न आल्याने ते नालीत पडतात, आजी- माजी मंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री, मंञी, व्हि. आय. पी. व्यक्तींच्या भेटी साठी च तात्पुरती डागडुजी  केली जाते. येथील नाल्यांची उंची वाढवून त्या वर ढापे टाकावेत, बंद असलेल्या शैक्षणिक संस्था सुरू करून खुल्या प्रांगणात शाळा भरवण्यात याव्यात. या मागण्यांचा  निवेदनात समावेश असून मागण्या मान्य न झाल्यास गुरू रविदास महाराज जयंती दिनी धरणे व लाक्षणिक उपोषण केले जाईल. असा इशारा लेखी निवेदनात देण्यात आला.