‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात जालन्यात विघ्नहर्त्याचे स्वागत 

जालना ,१९ सप्टेंबर /प्रतिनिधी :-गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात, गुलालाची उधळण आणि ढोल-ताशांच्या दणदणाटात जिल्ह्यात मंगळवारी लाडक्या गणेशाचे आगमन झाले.

गणपतीला घरी घेऊन जाण्यासाठी भक्तांनी गर्दी केली. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. या निमित्ताने बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल झाली. लाडक्या गणेशाची वाट पाहणार्या भक्तांनी सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी केली होती. गणेशाला घरी नेताना आबालवृद्धांचा उत्साह द्विगुणित झाला होता.गुलाल आणि फुलांची उधळण करत सर्वत्र जयघोष केला जात होता. 

(छायचित्रे  -अनिल व्यवहारे)

जालना शहरात आज गणेश चतुर्थी निमित्त ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नाचत गणरायाची स्थापना करण्यात आली मोठ्या उत्साहाने लहान बालकांसह युवकांनी युवतींनी जल्लोषात गणरायाचे स्वागत केले (छाया अनिल व्यवहारे)