जालना जिल्ह्यात 23 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह

जालना दि. 18 :- जालना शहरातील एकुण 23 रुग्णांचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण– 5925असुन सध्या रुग्णालयात – 400 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 2352, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–61, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या – 9112, एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने–23 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-1281 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -7093,रिजेक्टेड नमुने -35, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या – 422 एकुण प्रलंबित नमुने- 703,यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या – 1898

कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या – 820, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-370 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या -37, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-17846, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या – 54 एवढी आहे.

जालना शहरातील जेपीसी बँक परिसरातील रहिवासी असलेला 80 वर्षीय पुरुष रुग्णास श्वसनाचा व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 8 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 5 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 17 जुलै 2020 रोजी सायंकाळी 6.40 वाजता त्यांचा मृत्यु झाला. जालना शहरातील भिमनगर परिसरातील रहिवासी असलेला 52 वर्षीय पुरुष रुग्णास श्वसनाचा , उच्च रक्तदाब,मधुमेह व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 12 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 14 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 17 जुलै 2020 रोजी सायंकाळी 7.40 वाजता त्यांचा मृत्यु झाला. जालना शहरातील गोपालपुरा परिसरातील रहिवासी असलेला 65 वर्षीय पुरुष रुग्णास श्वसनाचा,मेंदुतील नसेतुन रक्तस्त्राव, उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 17 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 17 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 18 जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस 184 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन -1004 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 876 वाहने जप्त,आय. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड-99 हजार 600, मुददेमाल जप्त -26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 5 लाख 84 हजार 930 असा एकुण 7 लाख 11 हजार 338 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *